पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भविष्य निर्वाह निधी खाते उतारा

 अर्थ विभाग,जिल्हा परिषद सातारा या कार्यालयाने सन 2024-25 या वर्षापासून जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार असलेले प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी नवीन वेबबेस संगणकीय  भविष्य निर्वाह निधी प्रणाली Smart GPF ( भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन प्रणाली) विकसित केलेली आहे. सदर प्रणालीतून सन 2024-25 चे खातेउतारे वाटप करण्यात येत आहेत.  या प्रणालीतून सन 2024-25 या वर्षापासून सर्व भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना त्यांचे भविष्य निर्वाह निधीचा खातेउतारा  https://www.zpsataragpf.com/User/rptFinalFundAccount24_25.aspx  संकेतस्थळावर पाहता येणार असून त्याची प्रिंटही काढता येणार आहे.  खालील link व्दारे ऑनलाईन खातेउतारा काढण्यात येणार आहे.

सुधारीत जात संवर्ग यादी

सुधारीत जात संवर्ग यादी 2025  

जिल्हा अंतर्गत बदली सुधारणा १४मे२०२५ GR

  जिल्हा अंतर्गत बदली सुधारणा १४मे२०२५GR

मी आणि माझं शिक्षण – 'The Learning Chalk' ची सुरुवात

              📌 शिक्षण ही एक सतत चालणारी वाटचाल आहे – शिकण्याचीही आणि शिकवण्याचीही . शिक्षक म्हणून माझा प्रवास फळ्यावर लिहिलेल्या पहिल्या शब्दापासून सुरू झाला आणि आजही प्रत्येक वर्गात, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मी काहीतरी नवीन शिकते आहे.  जेव्हा मी पहिल्यांदा वर्गात उभी राहिले, तेव्हा माझ्या हातात चॉक होता आणि मनात अनेक विचार. शिकवणं म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक वाचून दाखवणं नव्हे, हे लवकरच लक्षात आलं. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची शैली वेगळी असते – कुणी ऐकून शिकतो, कुणी पाहून, तर कुणी करून पाहिल्यावरच समजतं. म्हणूनच मी शिकले – " शिकवण्याआधी समजून घेणं गरजेचं आहे." ☝'The Learning Chalk' का सुरू केला? आजच्या डिजिटल युगात शिक्षणाच्या पद्धती सतत बदलत आहेत. पारंपरिक चॉक ते स्मार्ट बोर्ड – शिक्षक म्हणून आपली भूमिका फक्त ज्ञान देणाऱ्याची नाही, तर शिका-शिकवा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्याची झाली आहे. ‘The Learning Chalk’ हा ब्लॉग मी सुरू केला आहे कारण: मला माझे शिक्षणातील अनुभव आणि गोष्टी मांडायच्या आहेत इतर शिक्षकांनीही त्यांच्या अनुभवांमधून शिकावं असं वाट...