मी आणि माझं शिक्षण – 'The Learning Chalk' ची सुरुवात
📌शिक्षण ही एक सतत चालणारी वाटचाल आहे – शिकण्याचीही आणि शिकवण्याचीही. शिक्षक म्हणून माझा प्रवास फळ्यावर लिहिलेल्या पहिल्या शब्दापासून सुरू झाला आणि आजही प्रत्येक वर्गात, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मी काहीतरी नवीन शिकते आहे.
जेव्हा मी पहिल्यांदा वर्गात उभी राहिले, तेव्हा माझ्या हातात चॉक होता आणि मनात अनेक विचार. शिकवणं म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक वाचून दाखवणं नव्हे, हे लवकरच लक्षात आलं. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची शैली वेगळी असते – कुणी ऐकून शिकतो, कुणी पाहून, तर कुणी करून पाहिल्यावरच समजतं.
म्हणूनच मी शिकले – "शिकवण्याआधी समजून घेणं गरजेचं आहे."
☝'The Learning Chalk' का सुरू केला?
आजच्या डिजिटल युगात शिक्षणाच्या पद्धती सतत बदलत आहेत. पारंपरिक चॉक ते स्मार्ट बोर्ड – शिक्षक म्हणून आपली भूमिका फक्त ज्ञान देणाऱ्याची नाही, तर शिका-शिकवा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्याची झाली आहे.
‘The Learning Chalk’ हा ब्लॉग मी सुरू केला आहे कारण:
मला माझे शिक्षणातील अनुभव आणि गोष्टी मांडायच्या आहेत
इतर शिक्षकांनीही त्यांच्या अनुभवांमधून शिकावं असं वाटतं
एकत्र आलो, तर शिकवणं अधिक समृद्ध होईल, असा विश्वास आहे.
💁काय मिळेल इथे?
या ब्लॉगवर तुम्हाला सापडतील:
👉शिक्षणविषयक विचारमंथन
👉क्लासरूम टिप्स आणि अॅक्टिव्हिटीज
👉भावनिक/मानसिक शाळेतील अनुभव
👉टूल्स, टेक्नॉलॉजी आणि शैक्षणिक साधनं
आणि अधूनमधून मनाला भिडणाऱ्या छोट्या गोष्टी...
शेवटी...
"शब्द फळ्यावर लिहिताना ते विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे उमटतात."
हा विश्वास घेऊन मी माझ्या चॉकचा वापर करते – विचारांचे आणि अनुभवांचे रूप देण्यासाठी.
The Learning Chalk हे त्या प्रवासाचं एक माध्यम आहे.
आपणही या प्रवासात सहभागी व्हा, प्रतिक्रिया द्या, आणि आपल्या शिकण्याच्या वाटा समृद्ध करा.
– योगिनी प्रविण कवितके📝
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा